Rohit Pawar pudhari photo
पुणे

MPSC Online Exam: एमपीएससीची पूर्वपरीक्षा ऑनलाईन घेणे रद्द करा; आमदार रोहित पवार यांची मागणी

मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एमपीएससी परीक्षार्थींचा पूर्वपरीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाला विरोध असून, हा निर्णय रद्द करावा. ऑफलाईन परीक्षा घेण्याला माझा पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांची समिती घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत. तसेच हा निर्णय रद्द न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या ऑनलाईन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे आणि पेपरफुटीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे संगणकाधारित परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. या शासन निर्णयात अनेक गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मुळीच मान्य नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास आमचा पाठिंबा : पवार

देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रातील एका नेत्याला सर्वोच्च पद मिळाले, तर त्यांना शुभेच्छा देतो. सध्या देशात एनडीएची सत्ता आहे.

जर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान केले तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिकाही आ. रोहित पवार यांनी मांडली. मराठी माणसाला संधी मिळण्यासाठी गुजरातची कृपा महाराष्ट्रावर व्हावी ही इच्छा असल्याचे नमूद करून देशात २०२९ पर्यंत भाजपाची सत्ता राहील, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT