शहरावर मान्सून मेहरबान;12 वर्षांतील विक्रम मोडले File Photo
पुणे

Pune Monsoon: शहरावर मान्सून मेहरबान; 12 वर्षांतील विक्रम मोडले

मान्सून 26 मे रोजीच दाखल झाल्याचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Pune receives highest monsoon rainfall in 12 years

पुणे: यंदाच्या जून महिन्यात सरासरीपेक्षा 80 टक्के पाऊस झाल्याने गत 12 वर्षांतील विक्रम मोडीत काढले आहेत. शहरातील जूनमधील पावसाची सरासरी 156 मि. मी. इतकी आहे. मात्र, शहरात 30 जूनअखेर तब्बल 267.5 मि.मी. पाऊस झाला आहे.

यंदा मान्सून शहरात 26 मे रोजीच दाखल झाल्याने तो सरासरीपेक्षा जास्त झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. (Latest Pune News)

यंदा शहरात मान्सून विक्रमी वेळेत म्हणजे 26 मे रोजी दाखल झाला. राज्यात कोकण वगळता इतर भागांत पाऊस कमी झाला. कारण, मान्सून मुंबई आणि पुणे शहरातच 13 दिवस अडखळला होता. त्यामुळे प्रामुख्याने घाट माथ्यावर जास्त पाऊस झाला. त्या भागात जूनमध्ये सरासरी 1000 ते 2400 मि. मी. पाऊस झाला, त्याचा फायदा शहराला झाला. शहरात जूनमध्ये 267.5 मि. मी. पाऊस पडला.

यंदाच्या जूनमधील पावसाची वैशिष्ट्ये :

  • जूनमध्ये पुण्याची सरासरी ही 156.9 मि.मी. आहे. यंदा 30 जूनअ?ेर 267.5 मि. मी. पाऊस झाला. त्याची टक्केवारी 80 टक्क्यांपेक्षा होते.

  • सन 2014 ते 2025 या बारा वर्षांच्या आकडेवारीनुसार जूनमधील पावसात लक्षणीय बदल दिसून आले आहेत.

  • गत सहा वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीनुसार 2014 ते 2019 दरम्यान जूनची सरासरी 139.6 मि.मी. होती.

  • सन 2020 ते 2025 या पाच वर्षांत जूनची सरासरी 166.4 मि.मी. आहे; म्हणजे शहरात जूनमध्ये पाऊस वाढतो आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT