पुणे : पुढारी वृत्तसेवा
अनुकूल स्थितीमुळे मानूनचा वेग वाढत असून, अल निनोचा प्रादुर्भाव झुगारून केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
मान्सून सध्या अंदमान,निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर, अरबी समुद्राच्या काही भागात स्थिर होत आहे. दरम्यान मान्सून पुढे सरकण्यास सध्या अतिशय अनुकूल अशी स्थिती आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात मान्सून अरबी समुद्रातील दक्षिण पूर्वेकडील बरासचा भाग व्यापणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरातील दक्षिणपश्चिम आणि पूर्वेकडील भाग, त्याचप्रमाणे अंदमान समुद्रासह अंदमान निकोबार बेटांवरील उर्वरित भाग व्यापणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात 20 ते 22 मे दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावणार असून, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि आसपासच्या भागात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे.