Monsoon 2026: मान्सूनची अंदमानात 21 ते 25 मे दरम्यान एंट्री; हवामान विभागाची पुष्टी

केरळमध्ये 3 ते 5 जून, महाराष्ट्रात 12 ते 14 जूनदरम्यान पावसाचा अंदाज; उष्णतेची लाट कायम राहणार
Rain
RainPudhari
Published on
Updated on

पुणे: अल निनोचा प्रभाग झूगारून मान्सून वेळेवरच म्हणजे 21 ते 25 मे दरम्यान अंदमानात दाखल होईल. केरळ मध्ये तो 3 ते 5 जुन दरम्यान तळकोकणात 7 ते 9 जून आणि मुंबई, पुण्यात येण्यास 12 ते 14 जून उजाडेल.

Rain
Pune Construction Workers Struggle: ‘पोटासाठी राबतोय...’ भरउन्हात शहर उभारताना बांधकाम मजुरांचा संघर्ष

अंदमानच्या सागरात मान्सूनची हालचाल सुरू असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने सर्वप्रथम चार दिवसांपूर्वी दिले होते. त्याला हवामान विभागाने पुष्टी दिली आहे.या आठवड्याच्या अखेरीस, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Rain
Pune Crime: आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह; आर्थिक समस्यांमुळे टोकाचे पाऊल उचल्याचा संशय

उष्णतेची कायम राहणार....

  • पुढील ४-५ दिवसांत पूर्व राजस्थान व त्याला लागून असलेला मध्य भारत, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही तुरळक भागांतही उष्णतेची लाट सक्रिय राहील.

  • पुढील ४-५ दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी व कराईकल, केरळ व माहे आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही तुरळक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि आसाम व मेघालयच्या काही तुरळक भागांत 'मुसळधार पाऊस' (७-११ सें.मी.) नोंदवला गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news