Rain Pudhari
पुणे

Monsoon 2026: मान्सून अंदमानात दाखल; केरळमध्ये 26 मे, महाराष्ट्रात 2 ते 5 जून दरम्यान पावसाची शक्यता

यंदाही मान्सून वेळेआधी सक्रिय; 16 वर्षातील दुसरा विक्रम नोंद, शेतकऱ्यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही सुसाट वेगाने मान्सून अंदमानात नियोजित वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. मागच्या वर्षी तो 13 मे रोजी अंदमानत आला होता, यावर्षी 16 मे रोजी तो आल्याने केरळमध्ये 26 मे तर महाराष्ट्रात 2 ते 5 जून दरम्यान दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

यंदा अल-निनोचे मान्सूनवर सावट आहे असे बोलले जात होते, मात्र भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने यंदा मान्सून अल निनो चे सावट जुगारून नियोजित वेळेच्या तीन दिवस आधीच अंदमान बेटांवर दाखल झाला आहे.

केरळमध्ये तो 2 ते 5 जून दरम्यान येतो मात्र यंदाही तो वेळेआधीच म्हणजे 26 मे रोजी दाखल होईल असा अंदाज आहे तर महाराष्ट्रात नियोजित वेळेच्या तीन ते चार दिवस आधी म्हणजे 2 ते 5 जून दरम्यान तो येऊ शकतो असा यंदा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

मागच्या वर्षी 13 मे रोजी मान्सून अंदमानत आला होता त्यानंतर 24 रोजी महाराष्ट्रात आला होता. गत सोळा वर्षातला हा विक्रमी मान्सून होता. तशीच स्थिती यंदा दिसत असून मान्सूनचा वेग प्रचंड आहे त्यामुळे तो भरपूर पाऊस येईल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गत पाच वर्षातील अंदमान

बेटांवरचे मान्सूनचे आगमन....

  • 2021: 21 मे: थोडा उशीर

  • 2022: 16 मे: वेळेआधी

  • 2023: 19 मे: वेळेवर

  • 2024: 19 मे: वेळेवर

  • 2025: 13 मे: खूप लवकर

  • 2026: 16 मे: वेळेआधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT