पुणे

पतीसमोरच पत्नीवर बलात्कार करणार्‍या नराधमाची धिंड

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणार्‍याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडल्यानंतर त्या नरधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. इम्तियाज हशीम शेख (वय 47, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बोपखेल येथील 34 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी महिलेच्या पतीस 40 हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये इम्तियाज याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्यासमोरच फिर्यादीवर बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपीने याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली; परंतु तिने नकार दिला असता त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून व व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रसारित केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT