पुणे

पुणे : ओंकार कुडलेसह टोळीवर मोक्का कारवाई

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात दहशत माजविणार्‍या ओंकार कुडले याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 48 वी मोक्काची कारवाई आहे.

ओंकार उर्फ आबा शंकर कुडले, (रा. कोथरुड), अशोक उर्फ आशुतोष बाबासाहेब काजळकर (वय 25, रा. सुतारदरा, कोथरूड), अक्षय उर्फ बारक्या सुनील पवार (वय 27, रा. मातळवाडी फाटा, भूगाव), व्यंकटेश हरिदास अंकुशे (वय 27, रमाई चौक, रामनगर, वारजे), मयूर शंकर येनपुरे (वय 25, रा. मयूर कॉम्प्लेक्स, भूगाव), आकाश दीपक लोयरे (वय 23, रा. स्वप्नसिद्धी अंगण, भूगाव), ओंकार रघुनाथ साळवी (वय 24, रा. कोकरे चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश दत्तात्रय शिंदे (वय 28, रा. किष्किंधानगर, कोथरूड) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

कुडले आणि साथीदारांनी कोथरूड परिसरात तलवार उगारून दहशत माजविल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर पसार झालेल्या कुडले याला मावळातील पवनानगर भागातून गुन्हे शाखेने पकडले होते. कुडले याच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ हेमंत पाटील, उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी तयार केला होता. तो प्रस्ताव पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाला मंजुरी दिली. सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT