पुणे: जीएसटीच्या जाचातून देशाला मुक्तता मिळवून देण्याचे श्रेय काँग्रेस नेते राहुल गांधींनाच जाते. मोदी सरकारने लादलेल्या गब्बरसिंग टॅक्सविरुद्ध सातत्याने संघर्ष करून त्यांनी जनतेचा आवाज बनण्याचे काम केले, असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद चौक, टिळक रोड येथे सोमवारी (दि. 22) आयोजित आभारप्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. भरपावसातही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. (Latest Pune News)
या प्रसंगी संजय बालगुडे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, यशराज पारखी, स्वाती शिंदे, चेतन अगरवाल, आयुब पठाण, सुरेश कांबळे, प्रवीण करपे, शाबीर खान, भोला वांजळे, संकेत गलांडे, हसीना सय्यद अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोषणांनी दणाणला परिसर
या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ‘झुकता है नरेंद्र मोदी, जब बोलता है राहुल गांधी’, ‘गब्बरसिंग टॅक्स हटवल्याबद्दल राहुल गांधींना आभार’, ‘जीएसटीतून मुक्तता : श्रेय राहुल गांधींना आणि काँग््रेासलाच’, अशा अनेक घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.