इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  (Pudhari Photo)
पुणे

Indrayani River bridge collapse| स्थानिक आमदार म्हणतात; पूल शेतकऱ्यांसाठी, पर्यटकांनी…

Sunil Shelke | मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी घटनास्थळी येऊन बचावकार्याबाबत सुचना दिल्या

अविनाश सुतार

Sunil Shelke on Indrayani River Bridge Collapse

पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल आज (दि. १५) दुपारी अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर २० ते २५ पर्यटक पाण्यातून वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी घटनास्थळी येऊन बचावकार्याबाबत सुचना दिल्या.

यावेळी आमदार शेळके म्हणाले की, कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल जुना असून या परिसरातील शेतकऱ्यांसाठी ये -जा करण्यासाठी हा पूल बांधलेला होता. परंतु, आज या पुलावर मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने भार सहन न झाल्याने पूल कोसळला. त्यातच दुचाकीवरूनही पर्यटक आले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आहे. सदर लोखंडी पूल हा सुमारे 30 वर्ष जुना आहे. लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. सदर दुर्घटनेमधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला असून त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तीना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, (ता. मावळ) येथील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल इत्यादी रूग्णालया मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान 02 व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात अडकलेल्या एकाला बाहेर काढण्यात आले. सदर बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल व स्थानिक बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी उपस्थित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT