घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील चास गावात २ १ नोव्हेंबरला रोजी अल्पवयीन मुलगी निर्भयाने (नाव बदलले आहे ) गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०५/ २०२५ अंतर्गत चार जणांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
मागील दीड वर्षा पासून विधी संघर्षित बालक याने निर्भया सोबत प्रेमसंबंध ठेवले, तर दोन्ही विधी संघर्षित बालक व मुस्ताक जैनुद्दीन शेख (आरोपी) यांनी मिळून तिचे फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत विविध ठिकाणी बोलावून त्रास दिला. या मानसिक दबावाला कंटाळून निर्भयाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे परिसरात संतापाची लहर उसळली आहे.
दाखल गुन्ह्यांचा तपशील:बीएनएस २०२३: कलम १०७ (आत्महत्येस प्रवृत्त), ७४, ७५(२ ), ७८, ३५१(२), ३(५)पोक्सो: कलम ८, १२ या सर्व आरोपी/विधी संघर्षित बालक चास गावचे रहिवासी असून, घोड़ेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार तपास करीत आहेत. अल्पवयीन गुन्हेगारी वाढत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण आहे
गुन्ह्यातील तपास वेगाने सुरू असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. तीन विधी संघर्ष बालकांना प्राथमिक तपासानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच, सज्ञान आरोपीला आवश्यक वैद्यकीय तपासणी करून सर्वोच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींची पूर्तता करत अटक करण्यात आलेली आहे.साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार (घोडेगाव) यांची माहिती