महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा
आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्तर आंबेगावमधील सुमारे 40 गावांमध्ये 500 हेक्टरवर मका पिकावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.
हुतात्मा बाबू गेनू जलाशय व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्या 40 गावांमध्ये उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध होत असते. त्यामुळे नव्वद दिवसांत भरपूर पैसा व ओला चारा मिळवून देणारे पीक म्हणून या भागात मका पिकाची लागवड केली जाते. दुभत्या जनावरांची संख्या तालुक्यात जास्त असल्याने दुहेरी उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे शेतकरी वळला आहे.
यंदा उन्हाळा कडक असल्याने लष्करी अळीला पोषक वातावरण मिळत आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लष्करी अळी पिकाचा मुख्य गाभा खात असल्याने पिकाची वाढ खुंटते. परिणामी, कणीस लहान व रोगग्रस्त निघते. उत्पादनात मोठी घट येते. लष्करी अळीला आळा घालण्याचे मोठे आव्हान शेतकर्यांपुढे आहे. त्यातच लष्करी अळी दहा दिवसांच्या अंतराने पुन्हा पिकावर हल्ला करते. परिणामी, शेतकर्यांवर वारंवार महागडी औषधे फवारावे लागत आहे. त्यामुळे उत्पादन खचार्त वाढ होत ाहे.
कृषी विभागाकडून शेतकर्यांना कोणतेही साहाय्य होत नसल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.