पिंपरी : दगदग, ताण-तणाव, आहाराकडे दुर्लक्ष अशा कारणांमुळे शहरातील महिलांमध्ये मायग्रेनची समस्या वाढत असून एकूण रुग्णांमध्ये पूर्वीच्या तुलनेत महिलांचे प्रमाण 20 टक्क्याने वाढले असल्याचे निरीक्षण आहे.
काय आहे कारण?
ताणतणाव, कामाचा व्याप, आहाराकडे दुर्लक्ष, सतत काळजी करणे, अनामिक भीती बाळगणे, व्यसन करणे आदी कारणांमुळे मायग्रेनची समस्या निर्माण होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
पुरुषांपेक्षा महिला बळी
सध्याच्या जीवनशैलीत महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणाप्रमाणे वाढलेल्या रुग्णांमध्ये 5 टक्के पुरुष तर 20 टक्के महिलांचे प्रमाण आहे. हॉर्मोन्समधील बदलामुळेही पौगंडावस्थेतील 17 ते 18 वर्षातील मुलींना तर 30 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये मायग्रेनच्या त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
काय काळजी घ्याल
शरीराला हवी असणारी पुरेशी झोप घेतल्याने चिडचिडेपणा कमी होऊ शकतो. तसेच नियमित योगासन, व्यायाम करावा. ध्यानधारणा केल्याने देखील मन शांत होते. वेळेत आहार घेऊन त्यात पालेभाज्यांचा समावेश करावा. मासिक पाळीवेळी पुरेसा आराम करावा.
महिलांच्या मासिक पाळीच्या दिवसात हा त्रास आधिक वाढतो. तसेच अनेकजण उपचार न घेता हा आजार अंगावर काढतात. त्यामध्ये आळस, अस्वस्थ वाटणे, जांभाळ्या येणे, डोक्याची एक बाजू दुखणे असा त्रास होतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे गरजेचे आहे.
– डॉ. पूजा मिसाळ, मानसोपचारतज्ज्ञ
वेळेत जेवण न करणे, पाणी कमी पिणे, मासिक पाळीच्या दिवसात पुरेशी झोप न घेणे, कडक उन्हात जाताना काळजी न घेणे, कामाचा अधिक तणाव, उन्हात गॉगलचा वापर न करणे यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. वेळीच उपचार न केल्यास मेंदूत रक्तस्त्राव होण्यापर्यंत घटना घडल्या आहेत.
– शिवराज हुंगे, मेंदूविकार तज्ज्ञ
मासिकपाळीच्या दोन ते तीव दिवस आधी उलटी, मळमळ, होणे असा त्रास जाणवू लागला. सूर्यप्रकाश सहन न होणे, आवाज सहन न होणे, अन्न पचन न होणे अशी लक्षणे दिसू लागली. तपासणी केल्यावर मायग्रेनचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले. आता उपचार सुरू केले आहेत.
– एक रुग्ण
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.