पुणे

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार : मुरलीधर मोहोळ

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी मेट्रोच्या मार्गाचा विस्तार करून, त्याला पीएमपी, एसटी, रिक्षा या वाहतुकीच्या साधनांची जोड देणार असून, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान होऊन, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापू पठारे, सतीश मस्के, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, मंगेश गोळे, अशोक कांबळे, शंकर संगम, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे, ऐश्वर्या जाधव सहभागी झाले होते. मोहोळ म्हणाले, एक दशकाहून अधिक काळ पुणे मेट्रो प्रलंबित होती. भाजप सत्तेत आल्यानंतर स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही वेगाने सुरू आहे.

मोहोळ पुढे म्हणाले, कालबद्ध पद्धतीने शहरासाठी मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज होती आणि मेट्रोच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करीत आहोत. ही व्यवस्था आणखी व्यापक आणि भक्कम करण्याच्या दृष्टीने मेट्रोचा विस्तार करणेही तितकेच आवश्यक आहे. नव्या मार्गांमध्ये स्वारगेट ते कात्रज 5.4 किमी, पिंपरी ते निगडी 4.4 किमी, वनाज ते चांदणी चौक 1.5 किमी, रामवाडी ते वाघोली 12 किमी, हडपसर ते खराडी 5 किमी, स्वारगेट ते हडपसर 7 किमी, स्वारगेट ते खडकवासला 13 किमी आणि एसएनडीटी ते वारजे 8 किमी या मार्गांचा समावेश आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT