पुणे

पुणे : ‘त्या’ अर्भक मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकारी बडतर्फ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. विधिमंडळात याबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पिंपळे गुरव येथील दीप्ती विरनळ या गर्भवती महिलेच्या अचानक पोटात दूखू लागल्याने तिला औंध जिल्हा रुग्णालयात आणले होते. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याने ससून रुग्णालयात रवानगी केली.

महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कारवाई केली किंवा करण्यात येत आहे, अशी विचारणा तापकीर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना केली. संबंधित प्रकरणात चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिपरिचारिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT