Pune Bhor Narsapur Child Murder Protest Pune
पुणे

Bhor Crime: भोर हादरलं! 3 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारानंतर नरसापुरात संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा; बाजारपेठा बंद

Narsapur Child Murder Case: भोर तालुक्यातील नरसापुरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी मोठा आक्रोश मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

पुढारी वृत्तसेवा

Pune Bhor Narsapur Child Murder Protest: भोर तालुक्यातील नरसापुर गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गुरुवारी मोठा आक्रोश मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. गावातील वातावरण तणावपूर्ण असून संपूर्ण नरसापूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय भीमा कांबळे या वृद्ध व्यक्तीवर तीन वर्षांच्या चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर चिमुकलीचा मृत्यू झाल्याने गावात संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती समोर येताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

ग्रामस्थांनी नरसापूर ग्रामपंचायत कार्यालयापासून पुणे-सातारा महामार्गापर्यंत मोर्चा काढला. संतप्त नागरिकांनी आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणीही केली.

मोर्चामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत, अशी भावना व्यक्त केली.

घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून चिमुकलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांनी आरोपीवर न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांवरील आणि लहान मुलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT