पुणे

Pune News : साडेसतरानळी ग्रामस्थांकडून साखळी उपोषणाला सुरवात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजसेवक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ साडेसतरानळी हडपसर पुणे येथे सकल मराठा समाज साडेसतरानळी गावाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. या उपोषणाला संतोष माणिक तुपे, अतुल सुभाष तुपे, सुमित दीपकर तुपे, संदीप महादू तोडमल, गणेश काळूराम तुपे यांसह ग्रामस्थ उपोषणस्थळी बसलेले आहेत. या उपोषणाला ग्रामस्थांसह विविध संघटना, संस्था आणि इतर समाजांनी पाठींबा दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT