Sugar Factory Representative image Pudhari
पुणे

Omkar Group Sugar Factory Restart: ओंकार ग्रुपकडून बंद साखर कारखाना सुरू; १५ दिवसांत ऊस बिले जमा

मांडवगण फराट्यातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा, बाबुराव बोत्रे पाटील यांच्यावरील विश्वास दृढ

पुढारी वृत्तसेवा

मांडवगण फराटा: ओंकार ग््रुापने अनेक दिवस बंद असलेला कारखाना पुन्हा सुरू करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केवळ कारखाना सुरू करूनच न थांबता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले अवघ्या 15 दिवसांत जमा करून ओंकार ग््रुापने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे ओंकार ग््रुापचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने आहेत पण बाजारभाव जाहीर करण्यासाठी पुढे येत नाही; मात्र ओंकार ग््रुाप नेहमीच बाजारभाव जाहीर करण्यात आघाडीवर राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल, ही खात्री निर्माण झाली आहे. याबाबत ओंकार ग््रुापचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, ग््राामीण भागातील शेतकरी ऊसाचे टनेज वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. बियाणे, खत, पाणी, मजुरी यावर प्रचंड खर्च होतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला असतानाही शेतकरी जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात जात आहेत.

कुटुंबाची काळजी, मुलांचे शिक्षण, घरखर्च या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत शेतकरी रात्रंदिवस मेहनत करत असतो. अशा परिस्थितीत जर ऊसाला योग्य बाजारभाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडते. त्यामुळे ऊसाला योग्य व जास्त बाजारभाव देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. योग्य दर मिळाल्यास शेतकरी नक्कीच ऊस उत्पादन आणि टनेज वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करतील, असा विश्वास बोत्रे पाटील यांनी व्यक्त केला. ओंकार ग््रुापने घेतलेली ही भूमिका केवळ व्यावसायिक नसून, शेतकरी केंद्रित आणि सामाजिक बांधिलकी जपणारी असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. त्यामुळे ओंकार ग््रुाप आणि बाबुराव बोत्रे पाटील यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधान व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीतून करतात कारखान्यांची पाहणी

बाबुराव बोत्रे पाटील हे शेतकऱ्यांच्या कष्टांची जाण ठेवणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. ज्याप्रमाणे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतामध्ये कष्टाचे काम करत असतात, त्याचप्रमाणे बाबुराव बोत्रे पाटील हे देखील रात्रीच्या वेळी ओंकार ग््रुापच्या कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी करतात. कारखान्यातील कामकाज सुरळीत सुरू आहे की नाही, ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या वाहनांना काही अडचणी येत आहेत का, कामगारांच्या समस्या काय आहेत याचा ते स्वतः आढावा घेतात.

शेतकरी असो, ऊस वाहतूक करणारे चालक असोत किंवा कारखान्यातील कामगार असो सर्वांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. रात्री उशिरापर्यंत कारखान्याच्या परिसरात फिरून प्रत्यक्ष संवाद साधत समस्यांवर उपाय शोधण्याची त्यांची कार्यपद्धत सर्वसामान्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे. शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून बाबुराव बोत्रेपाटील यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ होत असल्याचे श्रीगोंदा येथील गौरी शुगरचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव आणि यवत येथील ओएसजी ग््राीन एनर्जी प्रा. लि कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेश थोरात यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT