पुणे

Ganeshotsav 2023 : नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर मंडप

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवासाठी 2019 ला देण्यात आलेली परवानगी या वर्षी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी अनेक मंडळांनी परवानगीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात मंडप थेट रस्त्यावरच उभारल्याचे चित्र आहे. मध्यवस्तीत अनेक प्रमुख रस्त्यांवर गणेश मंडळांनी अर्ध्यापेक्षा अधिक जागांवर मंडप टाकल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. असे असताना महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या : 

राज्य शासनाने यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवासाठी गणेश मंडप आणि देखावे उभारण्यासाठी महापालिकेकडून 2019 ला देण्यात आलेल्या परवानग्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एक तृतीयांश इतक्या प्रमाणात मंडप टाकण्यास परवानगी असून, अंतर्गत व गल्लीबोळातील रस्त्यांवर रिक्षा, अ‍ॅम्बुलन्स जाईल एवढी जागा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक प्रमुख रस्त्यांवर गणेश मंडळांनी रस्त्यांच्या 50 टक्यांपेक्षा अधिक जागेवर मंडप टाकल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक पोलिसांशी याबाबत चर्चा करून रस्त्यांवरच गणेश मंडप टाकणार्‍या मंडळांना देण्यात आलेल्या परवानगी तपासल्या जातील. तसेच ज्या मंडळांनी परवानगीचे उल्लंघन केल्याचे आढळेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
                                                             – विक्रम कुमार, आयुक्त मनपा 

SCROLL FOR NEXT