Manchar Agriculture Market Update
मंचर: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. 7) एकूण 8 हजार 987 डाग इतक्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली. मात्र, पावसामुळे भाजीपाला आवकेमध्ये लक्षणीय घट झाल्याचे चित्र होते. विशेषतः भुईमूग शेंगांना 10 किलोसाठी 400 ते 730 रुपये असा दर मिळाल्याने बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळाली, अशी माहिती सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
मंचर बाजार समितीत आंबेगाव, जुन्नर, खेड, पारनेर व शिरूर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. येथे विक्री प्रक्रियेनंतर शेतकर्यांना वजन, दर व एकूण रक्कम, याची माहिती त्वरित एसएमएसद्वारे मोबाईलवर मिळते. या पारदर्शकतेमुळे शेतकर्यांचा बाजार समितीवर विश्वास असून, यामुळे पाच तालुक्यांतील शेतकरी येथे माल घेऊन येतात, असेही थोरात यांनी या वेळी सांगितले. (Latest Pune News)
तरकारी मालाचे दहा किलोसाठीचे बाजारभाव (कंसात आवक) : कारले (226) : 350-650, गवार (533) : 550 - 1001, घेवडा (10) : 500 - 1200, चवळी (115) : 350 -600, ढोबळी मिरची (158) : 450 - 700, भेंडी (262) : 400 - 851, फ्लॉवर (3183) : 100 -321, भुईमूग शेंगा (469) : 300 - 730, दोडका (106) : - 650, मिरची (428) : 400 - 750, तोंडली (12) : 200 - 515, लिंबू (19) : 200 - 400, काकडी (1045) : 200 - 350, कोबी (592) : 70 -150, वांगी (58) : 300 -651, दुधीभोपळा (82) : 300 - 350, बीट (423) : 150 - 335, आले (15) : 200 - 280, टोमॅटो (158) : 250 - 500, मका (919) : 50 - 160, पावटा (1) : 600 - 800, डांगर भोपळा (11) : 100 - 120. उपसभापती सचिन पानसरे यांनी ही माहिती दिली.