Milk Adulteration Pudhari
पुणे

Manchar Fake Milk Racket: मंचरमध्ये बनावट दूधनिर्मिती रॅकेटचा पर्दाफाश; २६ जणांवर गुन्हा, १,३८५ किलो भेसळयुक्त साहित्य जप्त

अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; रसायनांच्या वापरातून कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

मंचर: जिल्ह्यातील मंचर परिसरात बनावट दूधनिर्मिती करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अन्न सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये २ लाख ४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल आणि १ हजार ३८५ किलो भेसळयुक्त साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात तब्बल २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये सुशांत हिंगे (मंचर), हेमंत टेके (अकलूज), संदीप लोढा (मंचर), संजोग यादव (भिवंडी), चेतन भोर (जुन्नर), कैलास लाळगे (शिरूर), कुणाल कुलवडे (जुन्नर), शुभम गिरवले (अहिल्यानगर), सचिन संपकाळ (सिल्लोड), वैभव हांडे (जुन्नर), शुभम वाळुंज (मंचर), अजित करंडे (राहुरी), रोशन देवकर (अवसरी), राजू सांडभोर (अवसरी), प्रमोद घोरपडे (राहुरी), प्रमोद कडू (राहुरी), बाबूराव झगडे (दौंड), सोनू घोरपडे (पिलिव), विठ्ठल जाधव (पाबळ), अभिजित काटे (उरुळी कांचन), अभिजित शेंडकर (माही जळगाव), आकाश सावंत (जुन्नर), सतीश केंजळे (पाबळ), मनोहर ढमाले (कडूस, खेड), ठकसेन अरगडे (पिंपळगाव) आणि राजेश तांबडे (अवसरी खुर्द) यांचा समावेश आहे.

तपासात आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करणे, त्याची साठवणूक, वाहतूक आणि विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत सुमारे २ लाख ४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल आणि १ हजार ३८५ किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास मंचर पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे. आता या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोधही घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT