Malegao Sugar Factory Election Result
बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ब वर्ग गटातून बाजी मारली. अजित पवार यांना ब वर्ग गटात 91 मते घेत विजयी झाले आहेत. तर भालचंद्र देवकते यांना 10 मते मिळाली आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या सर्वसाधारण ऊस उत्पादक गट म्हणजे पहिल्या गटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. रंजीत जाधवराव यांना 396 मते तर तावरे गटाचे उमेदवार गजानन काटे यांना 250 मते मिळाली आहेत. रंजीत जाधवराव 146 मतांनी पुढे आहेत.
बाळासाहेब तावरे यांना 366 मते आणि तावरे गटाचे यांचे रंजन काका तावरे यांना 313 मते मिळाली असून बाळासाहेब तावरे 53 मतांनी पुढे आहेत. राजेंद्र बुरुंगले यांना 321 मते तर तावरे गटाचे रमेश गोफणे यांना 197 मते मिळाली असून राजेंद्र बुरुंगले 124 मतांनी पुढे आहेत.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत एकूण चार पॅनेल असून अपक्ष उमेदवारांसह एकूण 90 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अजित पवार यांचे श्री निळकंठेश्वर पॅनेल, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरू-शिष्यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समितीचे पॅनेल आणि इतर अपक्ष यांच्यात चुरशीची लढत होत आहे.