पुणे

तळेगाव दाभाडे : बाजाराच्या दिवशी मुख्य रस्ता वाहतुकीस मोकळा ठेवण्याचे आदेश     

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे शहरात रविवारी भरणा-या आठवडे बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीसाठी कायमस्वरुपी पर्याय काढणे तसेच रुग्णवाहीकेस प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी व अंत्यविधीसाठी स्मशाभूमीकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा असावा याची बातमी दै. पुढारीमध्ये २० जून रोजी आली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन मुख्याधिकारी एन .के. पाटील यांनी दि. २१ रोजी संबधित सर्व व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेतली.

यामध्ये मारुती मंदिर चौक ते जिजामात चौक ते शाळा चौक पर्यंतचा रस्ता आठवडे बाजाराच्या दिवशी वाहातुकीसाठी मोकळा ठेवावा असा आदेश संबधीताना प्रस्तापित केला आहे.  उपरोक्त झालेल्या निर्णयाची नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांचेमार्फत काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून सर्व व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी केले.

त्याबरोबरच बैठकीमध्ये झालेल्या मागणीनुसार आठवडे बाजार समाप्त झाल्यानंतर बाजारमध्ये झालेला कचरा, स्वच्छता त्याच दिवशी करणेबाबत आरोग्य विभागास तात्काळ मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी आदेशित केले. तसेच नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या पाठीमागील भाजी मार्केटसाठी आरक्षित जागेवरती सुसज्ज असे भाजी मार्केट व डाळअळी येथील गणपती मंदिर माठीमागील पे अँँण्ड पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेवरती सुसज्ज वाहनतळ विकसित करण्यात येणार असलेबाबत मा. मुख्याधिकारी यांनी या बैठकीत माहीती दिली.

बाजाराच्या जागेमध्ये बदल करण्याबाबत विचार

विनिमयसाठी शहारातील व्यावसायिक माजी नगरसेवक आणि नगरपरिषद पदाधिकारी यांची बैठक नगरपरिषद कार्यालयामध्ये पार पडली. सदर बैठकीमध्ये सर्व बाबींवर सविस्तर चर्चा होऊन नागरिक, व्यापारी, प्रशासन, यांच्या संगनमताने पुढील निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने प्रसिद्धीस दिली.

  • यामध्ये बाजाराच्या दिवशी मारुती मंदिर चौक ते जिजामाता चौक ते शाळा चौक हा रस्ता पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुर्णपणे रिकामा ठेवणे.
  • मारुती मंदिर चौक ते डाळअळी गणपती मंदिर या रस्त्याच्या एका बाजूला फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देणे तर दुस-या बाजूला दुचाकी वाहन पार्किंगसाठी जागा राखून ठेवणे.
  • तीन चाकी, चार चाकी व इतर वाहनांसाठी नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळा मैंदानावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT