पुणे ः राज्यातील किमान तापमानात शनिवारी विक्रमी घट झाली.जळगाव (६),अहिल्यानगर (६.४), नाशिक (६.९)अंशावर खाली आल्याने हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.
यंदा राज्याचा पारा प्रथमच ६ अंशावर आला असून शनिवारी राज्य गारठले होते.उत्तर,मध्य महाराष्ट्र थंडीने जास्त गारठला असून जळगाव,अहिल्यानगर अन नाशिक येथे हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.राज्यात सर्वांत कमी तापमान जळगाव येथे ६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
शनिवारचे किमान तापमान...( अंश सेल्सिअस )
जळगाव ६,अहिल्यानगर ६.४, नाशिक ६.९,पुणे ७.३, कोल्हापूर १४.१, महाबळेश्वर १२.६, मालेगाव ७.८, सांगली ११.९, सातारा ९.४, सोलापूर १२.३, छ.संभाजीनगर १०.१, परभणी १०.८, अकोला १०.१,अमरावती १०.५, बुलडाणा ११.५, चंद्रपूर ११.६, गोंदिया ८.२, नागपूर ८.६,वर्धा ९.६,यवतमाळ ९