Rain Pudhari Photo
पुणे

Maharashtra Rain Update: पावसाचा जोर ओसरला; कोकणात मान्सून सक्रिय

उत्तर कोकणात सुरुवातीला पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून पुढील आठवडाभर राज्यात पावसाची स्थिती विभागनिहाय वेगळी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागात २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस राहील. उत्तर कोकणात सुरुवातीला पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस काही ठिकाणीच पाऊस अपेक्षित असून मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. त्यामुळे या भागातील पावसाची तूट भरून काढण्यासाठी मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही.

विदर्भात मात्र चित्र तुलनेने बरे आहे. २८ ऑगस्टला अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, त्यानंतर काही ठिकाणी पाऊस सुरू राहू शकतो. २ सप्टेंबर रोजी विदर्भात पावसाची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT