TET exam timetable and important dates
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 23 नोव्हेंबरला राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
त्यासाठी उमेदवारांना दि. 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. परीक्षेसंदर्भात ‘दैनिक पुढारी’च्या वतीने देण्यात आलेली बातमी तंतोतंत खरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापन,सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम,अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शिक्षक तसेच शिक्षक सेवक पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.
या परीक्षेशी संबंधित शासन निर्णय व सूचना, तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे आणि परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती "https:/// mahatet. in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल. तसेच 2018 आणि 2019 च्या टिईटी गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांना संबंधित परीक्षेसाठी अर्ज करता येणार नसल्याचेदेखील ओक यांनी स्पष्ट केले आहे.
असे आहे परीक्षेचे वेळापत्रक
‘टीईटी’ परीक्षेचा अर्ज भरण्याचा कालावधी
ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे : 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर
प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 10 ते 23 नोव्हेंबर
टीईटी परीक्षा : 23 नोव्हेंबर 2025
पेपर एक : सकाळी 10.30 ते दुपारी 1.00
पेपर दोन : दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00