शिवाजी शिंदे
पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांच्या मोडकळीस तसेच धोकादायक झालेल्या शाळा आणि वर्गखोल्या तसेच वापरात नसल्याने शाळांची दुरावस्था झाली आहे. अशा शाळाची पाडण्यात येणार आहेत. पाडण्यात आलेल्या शाळाच्या जागांवर नवीन इमारती प्रस्तावित आहेत. यामुळे या शाळांचा कायापालट होणार आहे. दरम्यान राज्यात सुमारे 1 लाख हजारांच्या आसपास शाळा असून,त्यापैकी 25 हजाराहून अधिक शाळा किंवा खोल्या मोडकळीस आणि धोकादायक झाल्या आहेत.
राज्यात मुंबई शहर आणि उपनगर वगळता राज्यात 34 जिल्हा परिषदा आहेत. या जिल्हा परिषदांच्या सुमारे 1 लाख 10 हजारांच्या आसपास शाळा आहेत.या शाळामध्ये सुमारे 38 लाख 65 हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना 1,लाख 92 हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदांच्या बहुतांश शाळा या राज्याच्य ग्रामीणा भागासह दूर दुर्गम भागात असून, या शाळांमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणावर पोहचली.
दरम्यान राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांच्या बांधण्यात आलेल्या काही इमारती अगर वर्ग खोल्या अत्यंत जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या आहेत. या स्थितीमुळे या शाळा अगर वर्गखोल्यामध्ये विद्यार्थी बसणे अत्यंत अवघड झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रकारच्या शाळांच्या इमारती पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच या इमारतींच्या जागेवर नव्याने अत्याधुनिक इमारत किंवा वर्ग खोल्या बांधण्यात येणार आहेत. या बांधण्यात आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्यामध्ये मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहेच शिवाय या शाळामधील विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धामध्ये उभे राहण्यास मद्त होणार आहे.