Maharashtra Rain Update Pudhari
पुणे

Maharashtra Rain: जुलैत पावसाची तुफान बॅटिंग, जूनमधील 80 टक्क्यांची तूटही भरुन काढली

राज्याची जून व जुलैची पावसाची सरासरी ५३४ मिलिमीटर एवढी आहे.

पुढारी वृत्तसेवा

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात जूनमध्ये सर्वत्र सुमारे ८० टक्के पावसाची तूट होती. जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्याने भरून काढली असून, दोन्ही महिन्यांची पावसाची सरासरी राज्यातील पावसाने पार केली असून, सरासरीच्या सहा टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २५ टक्क्यांनी जास्त झाला असून, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ सरासरीच्या जवळपास पोहोचला आहे.

राज्याची जून व जुलैची पावसाची सरासरी ५३४ मिलिमीटर एवढी आहे. जूनमध्ये पावसाने खूप मोठी ओढ दिल्याने जून आणि जुलैच्या सरासरीत मोठी तफावत पडेल, असे वाटत असतानाच गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक नोंद करत जादुई आकडा पार केला आहे. यात मध्य महाराष्ट्र २५ टक्के अधिक (अतिवृष्टी), कोकण एका टक्का अधिक (साधारण), मराठवाडा उणे आठ टक्के (सर्वसाधारण), विदर्भ उणे पाच टक्के (सर्वसाधारण), अशी स्थिती ३१ जुलैअखेर नोंदली गेली आहे.

विभागावार पावसाची टक्केवारी (१ जून ते ३१ जुलै २०२६)

  • महाराष्ट्र - सरासरी ५३४ पडला ५६५.६ - ६ टक्के अधिक

  • कोकण - सरासरी १७५५- पडला १७६७.५-१ टक्का अधिक

  • मध्य महाराष्ट्र - सरासरी ३८७.२ पडला ४८३-२५ टक्के अधिक

  • मराठवाडा - सरासरी ३०५.१- पडला २८१.७ - उणे 8 टक्के

  • विदर्भ - सरासरी ४८४.७ - पडला - ४६२.८- उणे 5 टक्के

जिल्हावार पडलेला पाऊस (टक्के)

  • कोकण -

- मुंबई - 27, मुंबई उपनगर- 37, पालघर - 65, रायगड- 19, रत्नागिरी- उणे 7, सिंधुदुर्ग - उणे 35, ठाणे -12.

  • मध्य महाराष्ट्र

अहिल्यानगर- उणे 7, धुळे -1, जळगाव-12, कोल्हापूर - उणे 3, नंदुरबार- उणे 47, नाशिक - 88, पुणे- 62, सांगली- उणे 3, सातारा - 42, सोलापूर- उणे 28.

  • मराठवाडा

बीड - उणे 23, छत्रपती संभाजीनगर- 33, धाराशिव- उणे 7, हिंगोली- उणे 30, जालना- उणे 17, लातूर - उणे 12, नांदेड - उणे 6, परभणी- उणे 10.

  • विदर्भ

अकोला - उणे 10, अमरावती - उणे 13, भंडारा- 2, चंद्रपूर- उणे 15, बुलढाणा- 17, गडचिरोली- 15, गोंदिया- उणे 14, नागपूर- उणे 2, वर्धा- उणे 10, वाशिम-12, यवतमाळ- उणे 17.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT