Supriya Sule News: भाजप खासदार धनंजय महाडीक यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1,500 घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढा, असं धनंजय महाडीक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2000 कोटी रुपये खर्च करत उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले आहे. इतकेच नाही तर महिलांना धमकी देण्याची अक्षम्य चूक ही भाजपने केली आहे. महायुतीनेआधी लाडकी बहीण योजना आणली आणि त्यानंतर महिलांना धमक्या द्यायला सुरुवात केली. भाजपचे हे घाणेरडे राजकारण आहे.
आम्हाला संविधान हातात घेतले म्हणून अर्बन नक्सली म्हणतात. तरीही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हातात घेणार म्हणजे घेणार माझे आव्हान देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिल.
काय म्हणाले होते धनंजय महाडिक?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणार्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत अथवा सभेत दिसल्या, तर त्यांचे फोटो काढा. नावे लिहून घ्या आणि आमच्याकडे पाठवा. आम्ही त्याची व्यवस्था करू. खायचे आमच्या सरकारचे आणि गायचे त्यांचे, हे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.