पुणे: ‘समर्पित भावनेने काम करणाऱ्या पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलिस दल देशात अव्वल आहे,’ असे मत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले. 20 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याचा समारोप हडपसर-रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या आवारात झाला. या वेळी शुक्ला बोलत होत्या.
निवृत्त पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक दीपक पांडे, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, पिंपरी-चिंचवडचे सहपोलिस आयुक्त शशिकांत महानवर, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या शारदा राऊत, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुते, डॉ. बसवराज तेली, पल्लवी बर्गे, सौरभ अगरवाल, स्वप्ना गोरे या वेळी उपस्थित होते. (Latest Pune News)
शुक्ला म्हणाल्या, ’पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या माध्यमातून पोलिसांचे तपास कौशल्य वाढीस लागते. पोलिस दलातील कर्मचारी समर्पित भावनेने काम करतात. पोलिस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी यापुढील काळात प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे.’
स्पर्धेत सहभागी 26 संघांनी शिस्तबद्ध संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच त्यांना मेळावा व स्पर्धेविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सर्व स्पर्धांमधील उत्कृष्ट संघांना खालीलप्रमाणे फिरते चषक प्रदान करण्यात आले आहेत.
सीसीटीएनएस बेस्ट घटक परफॉर्मन्स ट्रॉफी
सांगली नाशिक ग्रामीण मुंबई पूर्व विभाग
बेस्ट टीम परफॉर्मन्स ट्रॉफी
सायंटिफीक एड टू इन्व्हेस्टीगेशन : नागपूर
पोलिस फोटोग्राफी : कोल्हापूर परिक्षेत्र
पोलिस व्हिडीओग्राफी : एस. आर. पी एफ परिक्षेत्र
संगणक सजगता : कोल्हापूर परिक्षेत्र
श्वान स्पर्धा : अमरावती परिक्षेत्र आणि गडचिरोली परिक्षेत्र
घातपातविरोधी तपासणी : एम. आय.ए.
के. अशोक कामटे फिरता चषक : एम. आय.ए.