

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संयुक्त पूर्व परीक्षा (गट- ब) साठी एकूण 674 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्य शासनाने पोलिस भरतीसाठी 2022 ते 2025 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून वाढीव संधी देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. (Latest Pune News)
त्याच धर्तीवर संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) साठीदेखील 2023 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून वाढीव संधीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी आयोगाकडे केली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा (गट- ब) 2025 या जाहिरातीमध्ये पोलिस उपनिरीक्षक 392 पदांचा समावेश आहे. सामान्यतः संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होत आहे.