Heatwave Pudhari
पुणे

Maharashtra October Heat: महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मालेगाव ३८.४ अंशांवर, राज्यात उष्णतेची लाट

Maharashtra Heat Wave News: परतीचा मान्सून कमकुवत; बहुतांश भागात तापमान ३७ अंशांवर, रात्रीच्या उकाड्यानेही नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: परतीचा मान्सून कमकुवत असल्यामुळे तो न बरसताच राज्यातून पुढे जाण्याच्या तयारीत आहे. शुष्क अन्‌ कोरड्या वातावरणामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. रविवारी (दि. ४) मालेगाव ३८.४ तर अमरावती शहराचा पारा ३८ अंशांवर गेला होता. बहुतांश भागाचे सरासरी तापमान ३७ अंशांवर गेले होते.

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा जबरदस्त जाणवत आहे. त्यामुळे हवामान शास्त्रज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. हवामान तज्ज्ञां‍च्या मते, यंदा ऑक्टोबर हीटचा ताप हा दरवर्षीच्या तुलनेत खूप लवकर म्हणजे पंधरा दिवस आधीच जाणवू लागला आहे. रात्रीचे तापमानदेखील वाढल्यामुळे अस्वस्थ करणारे वातावरण राज्यात तयार झाले आहे.

रविवारचे राज्याचे कमाल तापमान

मालेगाव ३८.४, अमरावती ३८, जळगाव ३७.४, पुणे ३४.८, अहिल्यानगर ३५, कोल्हापूर ३३.२, महाबळेश्वर २६.६, सांगली ३२.६, सातारा ३४.७, सोलापूर ३६.४, मुंबई ३६.५, सांताक्रूझ ३७.४, रत्नागिरी ३७.७, डहाणू ३७.९, अकोला ३७.१, बुलडाणा ३३.७, ब्रह्मपुरी ३५.२, चंद्रपूर ३५.४, गोंदिया ३३.८, नागपूर ३५.२, वाशिम ३५, वर्धा ३६.५, यवतमाळ ३६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT