पुणे : राज्यातील थंडीत किंचित घट झाली असून, किमान तापमान वाढले आहे. बुधवारी मोहोळ येथे सर्वात कमी 8.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
गेले काही दिवस राज्यात थंडीचा प्रभाव वाढला आहे. हंगामातील किमान तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, आता पुढील काही दिवस रात्रीचे तापमान उबदार राहणार आहे. किमान तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
बुधवारी राज्यातील विविध शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे : नाशिक 9.5, रत्नागिरी 17.1, परभणी 11.1, कोल्हापूर 15.3, सातारा 12.1, सोलापूर 13.8, कुलाबा 21, उदगीर 12.4, महाबळेश्वर 12, माथेरान 16.8, पणजी 18.1, नंदुरबार 13, डहाणू 16.3, पुणे 9.9, हर्णे 21.4, सांताक्रूझ 20.3, बारामती 9.6, नांदेड 11.2, सांगली 13.2, जेऊर 9, मालेगाव 9.8, धाराशिव 10.4, अहिल्यानगर 9.3, जळगाव 9.7, अलीबाग 21.1 अंश आहे.