आशिष देशमुख
पुणे: भयंकर उकाड्याने राज्याची भूजल पातळी दोन मीटरने खोल गेली असून, 75 पेक्षा जास्त तालुके गंभीर झोनमध्ये आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतील पाणी पातळी खूप खोल गेल्याने तेथे भूजलाची गंभीर स्थिती आहे.
केंद्रीय आणि राज्य भूजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणानुसार तालुकानिहाय भूजल पातळीचे वर्गीकरण गंभीर (क्रिटिकल), काहीअंशी गंभीर (सेमी क्रिटिकल) आणि अतिशोषित (ओव्हर एक्स्प्लायटेड) गटांत केली आहे.
यात मराठवाडा भागातील बीड, जालना, लातूर या जिल्ह्यांची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील काही तालुके, सोलापूर, अहिल्यानगर, विदर्भातील काही तालुके गंभीर गटांत आहेत. तर, कोकण सुरक्षित झोनमध्ये आहे.
कारणे काय?
कमी पाऊस, उसासारखी पाणीखाऊ शेती, अनियंत्रित बोअरवेल.
अतिशोषित (ओव्हर एक्स्ल्पॉयटेड) तालुके
मराठवाडा: बीड, गेवराई, माजलगाव, जालना, जाफराबाद, अंबड, बदनापूर, भोकरदन, लातूर, औसा, चाकूर, निलंगा, धाराशिव, उमरगा, तुळजापूर.
पुणे जिल्हा: शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर.
सोलापूर: करमाळा, माढा.
अहिल्यानगर: पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत.
विदर्भ: बुलडाणा, लोणार, सिंदखेडराजा, अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, अमरावती, दर्यापूर, चांदूरबाजार.
महत्त्वाची निरीक्षणे
डायनामिक ग््रााऊंड वॉटर रिसोर्स असेसमेंटनुसार राज्यातील बहुसंख्य भाग (84 टक्के) सेफ झोनमध्ये असला, तरीही उर्वरित भागाची स्थिती गंभीर आहे.
भूजल शेती, पिण्याचे पाणी, उद्योग वापरासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व आहे.
सुमारे 85 ग््राामीण भाग भूजलावर अलवंबून आहे.
केंद्राच्या अहवालानुसार, भूजल पुनर्भरणात किंचित वाढ झाली असली, तरीही पाणीवापराचा वेग खूप जास्त आहे.
तज्ज्ञांच्या मते, पाणीसाठवण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, जलसंवर्धन, भूजल वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.