Dattatray Bharne Pudhari
पुणे

Maharashtra Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के मदत करावीच लागेल; ३० सप्टेंबरनंतर सरकार निर्णय घेणार: कृषिमंत्री भरणे

सोयाबीन-कापसाचे मोठे नुकसान; एनडीआरएफ, राज्य सरकार आणि पीकविम्यातून मदतीची तयारी, दुष्काळ जाहीर झाल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील दुष्काळाबाबत पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील दौरा मी केला असून मी लवकरच ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक विभागाचाही आढावा घेणार आहे. दुष्काळाची मदत शंभर टक्‍के शेतकऱ्यांना करावीच लागेल. 30 सप्टेंबरनंतर राज्य सरकारला हा विषय हातात घ्यावा लागेल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी बँक) सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक तथा एनडीआरएफ, राज्य सरकारची मदत, पीकविम्याची रकमेतून शेतकऱ्यांना मदत होईल. पावसात मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा, म्हणणे आणि त्यांचा आक्रोश असणे साहजिक आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही महायुती सरकारची भूमिका आहे.

कृषिमंत्री भरणे म्हणाले...

  • शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या, कमी कर्ज असताना जादा दाखवून सरकारची फसवणूक करणाऱ्या संबंधित बँकेची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.

  • दुष्काळावर केंद्र सरकारकडे स्वतंत्र पॅकेजची मागणी करण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे.

  • तालुका किंवा विभागाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे.

  • शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माध्यमांनीही लक्ष द्यावे.

  • संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी.

  • शासनाने कोणताही तालुका दुष्काळी जाहीर केलेला नसून कोणत्याही फेक न्यूजवर कोणी विश्वास ठेवू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT