पुणेः राज्यात थंडीचा कडाका वाढला असून सलग तिसऱ्या दिवशी जळगावचा पारा सर्वात कमी ९.२ अंशावर खाली आला होता.तर सरासरी पारा ११ ते १२ अंशावर होता.
राज्यात यंदा उत्तरमहाराष्ट्र सर्वात लवकर गारठण्यास सुरुवात झाली असून जळगाव जिल्हा सर्वाधिक गारठला आहे तेथील किमान तापमान सलग तीन दिवसांपासून १० अंशाखाली आहे.त्यापाठोपाठ विदर्भ,मराठवा आणि मध्यमहाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे.
मंगळवारी गारठलेले शहरे....
जळगाव ९.२,गोंदिया १०.५,नाशिक १०.७,मालेगाव ११.२, अहिल्यानगर ११.४, अमरावती ११.७,पुणे १३.४, महाबळेश्वर १२.५, , सातारा १३.५, छ.संभाजीनगर १२.४, परभणी १३.५,अकोला १२.५, , बुलडाणा १३.७,. नागपूर १२.६, वाशिम ११.८, वर्धा १२.९, यवतमाळ ११.४
शहर गारठले पारा १३.४ अंशावर
पुणे शहराचे किमान तापमान मंगळवारी पुन्हा १३.४ अंशावर होते. त्यामुळे शहरात दिवसभर गारठा जाणवत होता. नागरिकांनी सकाळपासूनच गरम कपडे घालून बाहेर पडणे पसंत केले. आगामी चार ते पाच दिवस शहरात असाच गारठा राहणार असून, १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान किमान तापमान १० अंशाखाली जाईल असा अंदाज आहे.