Maharashtra Board SSC Exam 2025 Result today Marathi News
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. 13) दुपारी जाहीर होणार आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना उद्या दुपारी 1 वाजता मंडळाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत आठवड्यातच इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीचा निकाल केव्हा लागणार? याविषयीची उत्सुकता लागली होती. (Latest Pune News)
त्यानुसार, मंडळाने सोमवारी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या व इतर अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. त्यानंतर दुसर्या दिवसापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल.
कुठे पाहता येईल निकाल?
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही घेता येईल. शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.