Counselling Pudhari
पुणे

Maharashtra Board Exam Counselling: दहावी-बारावी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व हेल्पलाईन सुविधा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षा तणाव कमी करण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशक आणि हेल्पलाईन सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहावी-बारावी परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी परीक्षेच्या भीतीमुळे, नकारात्मक विचारांमुळे किंवा अपेक्षांच्या दडपणाखाली मानसिक तणाव अनुभवतात. अशा विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विशेष समुपदेशन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य मंडळाच्या स्तरावर 10 तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली असून, विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशक कार्यरत आहेत. हे समुपदेशक विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणार असून, अभ्यासाबाबतच्या अडचणी, मानसिक भीती, संभम; तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आवश्यक सल्ला देणार आहेत. यासोबतच राज्य मंडळ आणि नऊ विभागीय मंडळांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू केले असून, विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान कोणताही मानसिक ताण, भीती, अस्वस्थता किंवा मार्गदर्शनाची गरज भासल्यास विद्यार्थी या हेल्पलाईनवर थेट संपर्क साधू शकतात. परीक्षा हा आयुष्यातील एक टप्पा असून, तणाव न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, अडचण आल्यास मदत मागण्यास संकोच करू नये, असे आवाहन राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.

समुपदेशकांचे भमणध्वनी क्रमांक

  • 9960644411

  • 7972573742

  • 9359978315

  • 8169202214

  • 9371661255

  • 7208429381

  • 7709156068

  • 8421150528

  • 9404783996

या क्रमांकांवर विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT