मंगळवारपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकृती Pudhari Photo
पुणे

मंगळवारपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकृती

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

दिगंबर दराडे

पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार 22 ऑक्टोबर मंगळवारपासून संबंधित विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी 22 ते 29 ऑक्टोबर प या नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 ऑक्टोबर रोजी आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.

195- जुन्नर विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी घाडगे (भ्रमणध्वनी क्र. 9763715797), पंचायत समिती कार्यालय, जुन्नर व 196- आंबेगाव विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे (मो. क्र. 9423116611) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, आंबेगाव असा पत्ता आहे.

197- खेड आळंदी विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे (भ्र. ध्व. 9850722030), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, पहिला मजला, उपविभागीय कार्यालय, खेड(राजगुरूनगर), 198- शिरूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर (भ्र. ध्व. 9404641020), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, जुना अहमदनगर-पुणे रस्ता, शिरूर असा पत्ता आहे.

199- दौंड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला (भ्र. ध्व. 7620448001), पत्ता- तहसील कार्यालय, दौंड, 200- इंदापूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे (भ्र.ध्व. 7021297463) पत्ता- तहसील कार्यालय, इंदापूर, 201- बारामती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर (भ्र.ध्व. 7499818447) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती असा पत्ता आहे.

202- पुरंदर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे (भ्र. ध्व. 8408089376), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, उपविभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड, ता.पुरंदर , 203- भोर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी विकास खरात (भ्र.ध्व. 8830333748), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, राजवाडा चौक, भोर, असा पत्ता आहे.

204- मावळ विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले (भ्र.ध्व. 7020046461), पत्ता- तहसील कार्यालय, वडगाव मावळ, 205- चिंचवड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार (भ्र. ध्व. 9422943549), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव, 206- पिंपरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना यादव (भ्र.ध्व. 9767218901), पत्ता- डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नं. 26, निगडी, पुणे, असा पत्ता आहे.

207- भोसरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे (भ्र. ध्व. 9011033007), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर नं. 18, पूर्णानगर, चिखली, पुणे, 208- वडगांव शेरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर (मो. क्र. 9822873333), पत्ता- सहाय्यक आयुक्त कार्यालय, येरवडा-कळस-धानोरी झोनल कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे, ई-मेल असा पत्ता आहे.

209- शिवाजीनगर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव (भ्र. ध्व. 9423307711) पत्ता- साने गुरुजी ग्रंथालय, दुसरा मजला, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे, 210- कोथरूड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे (भ्र. ध्व. 8668437257), पत्ता- कै. अनुसयाबाई खिलारे शाळा, एरंडवणे, पुणे, असा पत्ता आहे.

211- खडकवासला विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने (भ्र. ध्व. 7350530333), पत्ता- पहिला मजला, एस.के.एन.एस.एस.बी.एम. इमारत, सिंहगड कॉलेज कॅम्पस, मध्यवर्ती ग्रंथालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली, 212- पर्वती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार (भ्र. ध्व. 9423462555), पत्ता- दुसरा मजला, कै. बाबुराव सणस क्रीडांगण, सारसबागेजवळ, पुणे, असा पत्ता आहे.

213- हडपसर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे (भ्र. ध्व. 9158862927), पत्ता- पुणे महानगरपालिकेचे विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, माळवाडी, हडपसर, पुणे, 214- पुणे कँटोन्मेंट विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे (भ्र.ध्व. 9595656577), पत्ता- भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या सभागृह, पीडब्ल्यूडी उपविभाग क्र. 5, तिसरा मजला, असेरनल प्लॉट, सागर प्लाझा समोर, पुणे कॅम्प, पुणे, असा पत्ता आहे.

215- कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते (भ्र.ध्व. 9604146186) या निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेटजवळ असा आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मिनल कळसकर यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT