Mahadev Jankar Bachchu Kadu Raju Shetty Rally In Pune :
पुणे : आता राज्यातील तीन बडे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर एकत्र येत आहेत. त्या नेत्यांनी तिसर्या आघाडीचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यावर येत्या 20 एप्रिल रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा 20 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे. त्या वेळी महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. महाराष्ट्राचे राजकारण युती आणि आघाडीवर सुरू झाले आहे. पुणे शहरात 20 एप्रिल रोजी ’युवा संघर्ष निर्धार परिषद 2025’ होणार आहे. खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.! या टॅगलाइन खाली परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
त्यामुळे या मेळाव्यातून राज्यातील सत्ताधार्यांना टीकेचे लक्ष केले जाणार आहे. राज्यात तयार होणारी ही तिसरी आघाडी प्रबळ विरोधक ठरणार का ? या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती होती. त्यानंतर त्या युतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर महायुती झाली. महायुतीला आव्हान देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही.
रविवारी गंजपेठ येथील सावित्रीबाई फुले सभागृहात होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्ञानेश्वर सलगर, अजितकुमार पाटील, बाळासाहेब कोकरे, सुनिता किरवे आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणार्यारा पत्रकार अनिल पवार, धनगर विवेक जागृती अभियानाचे विक्रम ढोणे, दत्तकुमार खंडागळे, सौरभ हटकर आणि नितीन आंधळे या पाच युवा संघर्ष युवा योद्धांचा सन्मान करण्यात येणार आहे.