Maharashtra Politics: सरकारची मजल आता नगरसेवक फोडण्यापर्यंत; रोहित पवारांचा घणाघात

'भाजपने तीन-चार लोक भुंकण्यासाठी ठेवले आहेत'
Rohit Pawar News
सरकारची मजल आता नगरसेवक फोडण्यापर्यंत; रोहित पवारांचा घणाघातFile Photo
Published on
Updated on

Rohit Pawar attack on government

पुणे: कर्जत नगरपंचायतमध्ये सुरू असलेले राजकारण मला अडचणीत आणण्यासाठी केले जात आहे. दबाव, भीती तसेच आमिष दाखवून हे सर्व करण्यात येत आहे. आमदार फोडून सत्तास्थापन करणारे हे सरकार आत्ता नगरसेवक फोडण्यापर्यंत पोहोचले आहे. कर्जत नगरपंचायत उलथविण्यासाठी महायुती सरकार खटाटोप करीत असल्याचा घाणाघात रोहित पवार यांनी केला. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाच्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, कर्जत नगर पंचायतमध्ये सर्वात जास्त नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे होते. तर अवघे दोन भाजपच्या विचारांचे होते. आताच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात त्यांनी एक पत्र दिले होते. अविश्वासाचा ठराव त्यांनी मांडला होता. बैठकीत उषा राऊत यांना त्यांचे म्हणणे मांडावे लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी महिनाभर चौकशी करत असतात. मात्र, इथे कायदा बदलला जात आहे.

सरकारने याबाबत 15 तारखेला एक नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार, बैठक पुढे ढकलण्यात आली असून, ती आत्ता 21 तारखेला होणार आहे. जिल्हाधिकारी आणि प्रांत यांना सोबत घेऊन फक्त कर्जतबाबत राजकारण केले जात आहे. सरकार एमआयडीसीसाठी का काही करत नाही, असा सवाल रोहित पवारांनी विचारला. सरकारला केंद्राविरोधात बोलण्याचे धाडस नाही. परिणामी, सीबीएएसी स्वीकारावे लागत, आहे असे देखील रोहित पवार म्हणाले.

‘तीन-चार लोक केवळ भुंकण्यासाठी’

भाजपने तीन-चार लोक भुंकण्यासाठी ठेवले आहेत. भाजपचे मोठे नेते या तीन-चार लोकांच्या मागे आहेत. मोठे नेते यांना भुंकायला लावत आहेत, ते भुंकतात त्यांच्यावर जास्त बोलायला नको असे म्हणत रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news