Vitamin D Deficiency pudhari
पुणे

Vitamin D Deficiency: चिंताजनक! भारतीयांमध्ये ’ड’ जीवनसत्त्वाची कमतरता

’द लँसेट’ अहवालातील निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे : भारतातील 70 टक्के लोकसंख्येमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता जाणवत आहे. नुकत्याच ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालातून हा निष्कर्ष समोर आला आहे. ‘व्हिटॅमिन डी’च्या तीव— कमतरतेमुळे सतत थकवा, हाडदुखी, सहज फ्रॅक्चर होणे आणि हाडांच्या जखमा उशिरा भरून येणे ही कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. शरीरासाठी अत्यावश्यक असलेल्या जीवनसत्त्वाची वेळेवर भरपाई न केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

बंदिस्त घरे, घरातील, ऑफिसमधील जीवनशैली, याशिवाय कपड्यांची निवड, वाढते प्रदूषण आणि आहारातून व्हिटॅमिन डी मिळण्याचे कमी स्रोतदेखील यामुळे कमतरता जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सर्वेक्षणातील निष्कर्ष

  • 70 टक्के ते 90 टक्के भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता

  • महिला आणि शहरी भागातील नागरिक सर्वाधिक प्रभावित

  • 30 टक्के मुलांमध्ये रिकेट्स-सद़ृश लक्षणे दिसून आली

  • 60 टक्के नोकरदार लोकांमध्ये थकवा व हाडदुखीची तक्रार

  • 50 टक्के खेळाडूंमध्ये स्नायू ताठरता आणि फ्रॅक्चरचा वाढलेला धोका

मुख्य कारणे

  • बंदिस्त घरात/ कार्यालयात जास्त वेळ घालवणे

  • प्रदूषणामुळे सूर्यप्रकाशात अडथळा

  • आहारात व्हिटॅमिन डीचा अभाव (उदा. मशरूम, मासे, अंडी, फोर्टिफाईड दूध)

  • प्रभावित गट

  • लहान मुले

  • स्त्रिया (गर्भवती व स्तनदा माता)

  • ज्येष्ठ नागरिक, खेळाडू

  • आयटी/कॉर्पोरेट कर्मचारी

उपाययोजना काय?

  • दररोज 20-30 मिनिटे सकाळच्या उन्हात राहणे

  • व्हिटॅमिन ‘डी’युक्त आहार घेणे

  • आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स

  • नियमित रक्ततपासणी- 25(जक)ऊ लेव्हल मोजणे

व्हिटॅमिन डीची कमतरता ही सध्या मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या बनली आहे. भारतात सध्या 70 ते 90 टक्के लोकसंख्या या त्रासाने ग्रस्त आहेत. यात लहान मुले, नोकरदार, व्यावसायिक, अगदी खेळाडूंचाही समावेश आहे. दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये सतत असे रुग्ण आढळून येतात, ज्यांना कोणतेही ठोस कारण नसताना हाडदुखी, थकवा, वारंवार फ—ॅक्चर होणे यांसारख्या तक्रारी असतात.
- डॉ. सना अहमद सय्यद, ऑर्थोपेडिक सर्जन, इनामदार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
व्हिटॅमिन डी हाडांची मजबुती, स्नायूंची कार्यक्षमता आणि शरीराच्या पुनर्बलन प्रक्रियेसाठी अत्यावश्यक आहे. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये रिकेट्स, प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिस, खेळाडूंमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर्स होण्याचा धोका वाढतो. दररोज काही वेळ सूर्यप्रकाशात राहणे, संतुलित आहार घेणे आणि आवश्यकतेनुसार पूरक गोळ्यांचा वापर हे यावरील उपाय आहेत. जोखमीच्या गटांमध्ये नियमित तपासणी करून वेळेत निदान केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.
डॉ. समीर पाटील,ऑर्थोपेडिक ट्रॉमा व स्पाइन तज्ज्ञ, वेन्सर हॉस्पिटल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT