लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : नगर परिषदेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय कालावधीत आजपर्यंत प्रशासकांनी काही रस्ते तयार करण्याचे ठराव पारित केले आहेत. रस्ते तयार करणे हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे सदर ठरावांची अंमजबजावणी करू नका,
अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी नुतन मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयी बोलताना जाधव व पुजारी म्हणाले, की लोणावळा नगर परिषदेने शहर विकासाचे अनेक ठराव केले आहेत. या ठरावांची अंमलबजावणी न करता नगर परिषदेची मुदत संपताच तत्कालीन प्रशासकांनी काही ठराविक भागात रस्ते करण्याचे ठराव केले
आहेत व त्यांची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. वास्तविक पावसाळा तोंडावर आला असताना प्रशासनाने शहरातील महत्वाची प्रश्न हाती घेणे गरजेचे आहे.
शहरातून वाहणारी नदी व नाले सफाई योग्यप्रकारे करणे, गवळीवाडा भागात मागील वर्षी पाणी साचले होते, त्या भागातील गटाराचा विषय मंजूर होऊनदेखील काम सुरू झालेले नाही. नांगरगाव, भांगरवाडी, बाजारपेठ, तुंगार्ली रोड, रायवुड या भागात पाणी साचले जाते, त्याठिकाणी पावसाळापूर्व कामे करत पाणी साचण्याची समस्या निर्माण होणार नाही.
https://youtu.be/uRpprmHUGnM