पुणे

लोणावळा : कर न भरल्यास कारवाई कुसगाव ग्रामपंचायतीचा मालमत्ताधारकांना इशारा

backup backup

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीचा कर न भरणार्‍या संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा कुसगाव ग्रामपंचायतीने दिला आहे. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत हद्दीतील सिंहगड महाविद्यालय तसेच आयआरबी कंपनी यांच्याकडून मागील काही वर्षांपासून कर भरला जात नसल्याचे सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सूरज केदारी यांनी सांगितले.

केदारी म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार करास पात्र मालमत्ताच्या नोंदी ग्रामपंचायतीने केल्या आहेत. सिंहगड संस्थेच्या 50 नोंदी आहेत. यापैकी 8 नोंदी ज्या शैक्षणिक इमारती आहेत, त्या करमुक्त केल्या आहेत.

28 मिळकती रहिवासी असून त्यांना कर लावला आहे; मात्र त्याचा कर ते भरत नाहीत. सदर प्रकरणी संस्थेने न्यायालयात धाव घेतली आहे.

कोरोनामुळे दोन वर्ष संस्था बंद होत्या. म्हणून कर भरणा करण्यासाठी जोर लावला नाही; मात्र यंदा कर न भरल्यास कारवाई करू.
राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांची कार्यालये व इतर मालमत्ता गावात आहेत.

त्यांनी सीएसआर फंड गावात विकास कामांसाठी वापरला नाही. वारंवार सूचना देऊनही मालमत्तांच्या नोंदी आयआरबी करत नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने ठराव करून कर लावला आहे.

याविषयी राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता, आमच्या शासकीय अस्थापना असल्याने त्यांना कर लागू होत नाही.

याबाबत ग्रामपंचायतीला कळविले आहे. तर सिंहगड संकुलचे संचालक एम.जी. गायकवाड म्हणाले की, कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या; मात्र त्यावर मार्ग काढण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरु आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT