पुणे

Loksabha election | भाजपच्या थापेबाजीला पुणेकर चाप लावणार : रवींद्र धंगेकर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाजपने गेली दहा वर्षे राष्ट्रीय पातळीवर आणि अनेक वर्षे पुणे शहराच्या पातळीवर जी थापेबाजी केली आणि पुणेकरांची फसवणूक केली त्याला पुणेकर यंदा मतदानाच्या माध्यमातून चांगलाच चाप लावणार आहेत, असे प्रतिपादन रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. धंगेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय पातळीवर मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, सन 2022 पर्यंत देशातील सर्वांना घरे देऊ, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू, विदेशातला काळा पैसा परत आणू अशा अनेक घोषणा केल्या, पण यातील प्रत्येक घोषणा ही शुद्ध थापेबाजी ठरली. यातले प्रत्यक्षात काहीही घडले नाही.

पुण्याच्या पातळीवरही गेली अनेक वर्षे आपण अशीच थापेबाजी ऐकत आलो आहोत. पुणे शहर स्मार्ट करणार, पुण्याला 24 तास समान पाणीवाटप करणार, पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ उभे करणार, जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करणार, मध्य पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवणार, अशा भाजपच्या थापा पुणेकरांच्या अंगवळणी पडल्या आहेत. त्यामुळे हा पक्ष विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा राहिलेला नाही, याची मनोमन खात्री पटल्याने या थापेबाजीला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून चाप लावण्याचा निर्धार पुणेकर नागरिकांनी व्यक्त केला आहे, असेही धंगेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT