पुणे

Loksabha Election : 3600 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई : पोलिस अधीक्षक संजय जाधव

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणार्‍या बारामती, पुरंदर, इंदापूर व भोर तालुक्यांतील 3600 जणांवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी ही माहिती दिली. बारामतीत पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक दर्शन दुगड, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, चंद्रशेखर यादव, गोरख गायकवाड आदी उपस्थित होते. पोलिसांच्या गेल्या दीड महिन्यातील कारवाईबाबत जाधव म्हणाले, बारामती विभागात पोलिसांकडून 153 दारुबंदीच्या केसेस करण्यात आल्या आहेत. 19 ठिकाणी जुगारावर कारवाई करण्यात आली.

बारामती तालुक्यात 57 लाख रुपयांचा गुटखा जप्त करत चार आरोपी गजाआड करण्यात आले. याशिवाय घरगुती गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याच्या कारवाईत साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. इंदापूरात हॉटेलमध्ये झालेला गोळीबार आणि राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराफाला लुटणे या दोन घटनांमध्ये मोक्काची कारवाई केली जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानबद्धतेच्या तीन कारवाया करण्यात आल्या आहेत. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 773 जणांची शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. चेकपोस्टवर परजिल्ह्यातून येणार्‍या वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.

वाहतुकीला शिस्त लावणार

बारामती शहर व तालुक्यात वाहतूक विभागासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती शहरात वाहतूक कोंडीसह पार्किंग व अन्य प्रश्न आहेत. सध्या वाहतूक पोलिस प्रत्येक चौकात असतील. शहरभर त्यांची गस्त सुरू असेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय निर्भया पथकाचे कामकाज यादव यांच्याकडे देण्यात आले आहे. प्रत्येक शाळा-महाविद्यालयाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. छेडछाड व अन्य घटनांना त्यामुळे आळा बसू शकेल.

सीसीटीव्ही यंत्रणेची गरज

शहरातील व्यावसायिकांनी पुढे येत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज जाधव यांनी व्यक्त केली. चोरी किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास सीसीटीव्हीची मोठी मदत पोलिस खात्याला होते. त्यामुळे व्यावसायिकांनी या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT