पुणे

मतदार जनजागृतीमुळे वरुडेत 64 टक्के मतदान

Laxman Dhenge

मंचर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील वरूडे (ता. शिरूर) गावात मागील लोकसभा निवडणुकीत अत्यल्प (9.5 टक्के) मतदान झाले होते. त्याची निवडणूक प्रशासनाने गंभीर दखल घेतली. मतदार जनजागृती पथकाने मतदारांमध्ये जागृती केल्याने यंदाच्या निवडणुकीत सुमारे 64.9 टक्के मतदान झाल्याची माहिती माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

तहसीलदार संजय नागटिळक, नायक तहसीलदार सचिन मुंडे, डॉ. सचिन वाघ, स्वीप नोडल अधिकारी सविता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सुनील भेके, नारायण गोरे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटडे, अभिजित नाटे, विनायक राऊत, सुरेश रोंगटे, मंगेश जावळे, काशिनाथ घोंगडे, सचिन तोडकर, बीएलओ प्रदीप डांगे यांनी वरुडे गावात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले.

वरुडे गावात मागील लोकसभा निवडणुकीत 1089 पैकी फक्त 104 मतदारांनी मतदान केले होते. त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वरुडे गावात सर्वात कमी 9.55 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 1146 मतदारांपैकी एकूण 750 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी 65.44 इतकी झाली. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल मतदार जनजागृती पथकाने मतदारांचे आभार मानले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT