पुणे

Loksabha election 2024 : रावेरमधून लढण्यास रोहिणी खडसेंचा नकार..

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांनी रावेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या स्नूषा, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी सोमवारी रावेर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठक झाली. या वेळी पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील उपस्थित होते. दरम्यान, श्रीराम पाटील हे रावेरमधून इच्छुक उमेदवार असून, त्यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.

चर्चा बाहेर सांगणे अयोग्य : जयंत पाटील

आघाडीतील पक्षांचे नेते बैठकांमध्ये काय चर्चा करतात ते बाहेर सांगणे योग्य नाही. आघाडी धर्म सगळ्यांना पाळावा लागेल. महाविकास आघाडीची मंगळवारी होणारी बैठक निर्णायक असेल. रावेरमधील सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. सातार्‍यातही आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, असे जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT