निमोणे : निमोणे (ता. शिरूर) परिसरात बिबट्या दिवसाढवळ्या दिसतो. येथील अनेक जनावरांना बिबट्याने ठार केले आहे. तसेच शेतकर्यांवरही बिबट्या हल्ला करतो. दरम्यान, अनेक लहान मुलांना बिबट्याने लक्ष्य केले आहे. असे असतानाही येथील जाधववस्तीवरील अंगणवाडी ही उसाने वेढलेल्या ठिकाणी भरते. यामुळे पालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. परिणामी, येथील मुले थेट बिबट्याच्या दाढेत दिलीत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Pune Latest News)
शिरूर तालुक्यातील निमोणेजवळच जाधववस्ती आहे. येथील अंगणवाडी चहूबाजूने ऊसशेतीने वेढलेली आहे. या परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर असल्याने अंगणवाडीतील मुलांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे येथे तातडीने उपाययोजना करून अंगणवाडीला संरक्षक भिंत मिळावी, अशी मागणी सागर काळे यांच्यासह इतर स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
या अंगणवाडीसाठी चार वर्षांपूर्वी अंकुश जाधव यांनी दोन गुंठे जागा उपलब्ध करून दिली. त्यात आता रानमळा नावाची छानसी अंगणवाडी उभी राहिली आहे. या अंगणवाडीत परिसरातील सुमारे 20 लहान मुले भविष्याची पायाभरणी करण्यासाठी येतात. मात्र. या अंगणवाडीला तीनही बाजूने ऊसक्षेत्राने वेढले असून, ऊस हे बिबट्यासाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते. त्यामुळे या अंगणवाडीतील मुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन गुंठे जागा उपलब्ध करून दिली. त्यात आता रानमळा नावाची छानसी अंगणवाडी उभी राहिली आहे. या अंगणवाडीत परिसरातील सुमारे 20 लहान मुले भविष्याची पायाभरणी करण्यासाठी येतात. मात्र. या अंगणवाडीला तीनही बाजूने ऊसक्षेत्राने वेढले असून, ऊस हे बिबट्यासाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते. त्यामुळे या अंगणवाडीतील मुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या अंगणवाडीला संरक्षक भिंत, सुरक्षित गेट तातडीने उपलब्ध करावे. त्यानंतरच येथील मुलांचा जीव सुरक्षित होऊन पालकांच्या मनावरील भीतीचे सावट कमी होणार आहे. त्यामुळे या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
या परिसरात बिबट्याचा मुक्त वावर आहे. आपल्या लहान मुलांना अंगणवाडीत पाठवून शेतकरी आई-वडील शेतात जातात. मात्र, येथील अंगणवाडीची स्थिती पाहता त्यांना सतत मुलांची काळजी लागलेली असते. त्यामुळे मुलांसासाठी येथील पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे