पुणे

Leopard News : नारायणगावात मादी बिबट जेरबंद !

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव येथील महेंद्र कोल्हे यांच्या घराजवळ बिबट्याला पकडण्यासाठी तीन आठवड्यापूर्वी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती जुन्नर वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की,पकडलेल्या बिबट्या मादी असून या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आला आहे. नारायणगाव येथील महेंद्र कोल्हे यांच्या रॉकी या पाळीव कुत्र्यावर तीन आठवड्यापूर्वी बिबट्याने हल्ला केला होता परंतु कोल्हे कुटुंबाने वेळीच आरडाओरड व फटाके वाजवून बिबट्याला पिटाळून लावले होते.

त्या नंतर बिबट्या या कुत्र्याच्या शिकरीसाठी परिसरात रात्रीचा फिरत असल्याचे स्थानिक लोकांनी पाहिल्यावर वन विभागाने कोल्हे यांच्या घराजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. बिबट्या पिंजऱ्याभोवती घिरट्या घालायचा परंतु पिंजऱ्यात काही जेरबंद होत नव्हता.बिबट्या पिंजऱ्यात यावा म्हणून कोंबडी व बकरी ठेवली होती. तरीही बिबट्या हुलकावनीच देत होता. अखेर मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि कोल्हे कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT