मांडवगण फराटा (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : मांडवगण फराटा परिसरामध्ये बिबट्याची पुन्हा दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मांडवगण फराटा येथील गायकवाड मळा येथील शेतकरी जनार्दन तुकाराम नागवडे यांच्या गोठ्यात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला केला. गाई ओरडल्याने घरातील व्यक्ती बाहेर आले तर समोर बिबट्या गाईला ओढत होता. त्यामुळे समोरासमोर बिबट्याचे दर्शन झाल्याने घरातील व्यक्ती देखील घाबरले. यावेळी घरातील नागरिकांनी बिबट्याचा व्हिडिओ शूट केल्याचे जनार्दन नागवडे यांनी सांगितले.
शिरूरच्या पूर्व भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी गोठे तयार केले आहेत. तरी देखील बिबट्याचे होणारे हल्ला पाळीव प्राण्यावरील काही थांबेना.या भागामध्ये विभागाने यापूर्वी चार ते पाच बिबटे पकडले आहेत. तरी देखील या परिसरामध्ये अजून मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतामध्ये मजूर काम करताना रात्री-अपरात्री शेतकरी शेतावर पाणी देण्यासाठी असताना अनेकवेळा शेतकऱ्यांना दर्शन झाले आहे. गेले काही दिवसापूर्वी वडगाव रासाई व इनामगाव या गावांमध्ये काही दिवसांपूर्वी माणसावर हल्ला केला आहेत.
हेही वाचा